कंदोली/वार्ताहर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान सुरू झाले असून सर्वसामान्याच्या आरोग्याची काळजी यामधून घेतले जाणार आहे त्यामुळे कळंगुट , पर्वरी , साळगाव भाजपा मतदार संघातील संयुक्तरीत्या राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानास काम करणाऱया स्वयंसेवकाने झोकून देऊन काम केले पाहिजे जेणेकरून प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य व्यवस्था मिळावे हा त्याचा उद्देश आहे असे प्रतिपादन माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सुकूर – पर्वरी येथे केले.
आज सकाळी सुकुर पंचायत सभागृहात कळंगुट ,साळगाव व पर्वरी भाजपा मतदार संघातील अशा संयुक्तरीत्या राष्ट्रीय संस्था स्वयंसेवक अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते .या आयोजनाच्या वेळी सुकुर जिल्हापंचायत सदस्य कार्तिक कुंडेकर पर्वरी भाजपा मतदार संघाचे अध्यक्ष कुंदा चोडणकर रेईस मगोस जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक कळंगुट भाजपा मतदार संघाचे अध्यक्ष ज्योती सिंग डीक्रूज व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यशाळेच्या दुसऱया सत्रात डॉक्टर साने स्वयंसेवकांना तिसऱया लाटे संदर्भात माहिती पुरविण्यात आली व त्यांना प्रत्येक वाडय़ावर जाऊन संक्रमित असलेल्या व्यक्तीना थर्मल गन अथवा ऑक्सी मिटर या उपकरणेद्वारे तपासणी करावी व तसा रुग्ण आढळल्यास त्यासंदर्भात डॉक्टरशी संपर्क साधावा जेणेकरून नागरिकांना चांगली सेवा मिळणार व अशाप्रकारे आपण येत असलेल्या तिसऱया लाटेवर मात करण्यास यशस्वी होणार आहे. या कार्यशाळेला तिन्ही मतदार संघातील निवडण्यात आलेले स्वयंसेवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.