प्रतिनिधी / कोल्हापूर
शास्त्रीनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सांगली जिल्हÎातील इस्लामपूर (ता. वाळवा) येथील 47 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1764 झाली आहे. गेल्या 24 तासांत 83 नवे रूग्ण दिसून आले. सक्रीय रूग्णसंख्या 685 वर पोहोचली आहे. तसेच 42 जण केरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 191 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
कोरोनाने शुक्रवारी सांगली जिल्हÎातील महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 764 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 857, नगरपालिका क्षेत्रात 352, कोल्हापूर शहरात 390 तर अन्य 165 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 42 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 191 झाली आहे.
जिल्हÎात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 83 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 2, भुदरगड 1, चंदगड 0, गडहिंग्लज 6, गगनबावडा 0, हातकणंगले 10, कागल 3, करवीर 3, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 4, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 13, कोल्हापूर शहरात 25 तर अन्य 15 जणांचा समावेश आहे. जिल्हÎात 1322 जणांची तपासणी केली. त्यातील 158 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. कोरोना रूग्णसंख्या 685 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून आलेल्या 915 अहवालापैकी 879 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 169 अहवाल आले. त्यातील 166 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 370 रिपोर्ट आले. त्यातील 308 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 51 हजार 640 आहेत. त्यापैकी 49 हजार 191 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 685 रुग्ण उपचार घेत आहेत. शहर आणि परिसरात 322 तर ग्रामीण भागात 122 जणांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली.