प्रतिनिधी / सांगली
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील प्रशासकीय इमारतीमध्ये असणाऱ्या लेखापरीक्षक कार्यालय येथे वर्ग 2 आणि वर्ग 3 च्या अधिकाऱ्यांना पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
लेखापरीक्षक कार्यालयाने गेल्या अनेक दिवसापासून तक्रारदाराचे काम पैसे न दिल्याने अडवून ठेवले होते. त्यामुळे तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती, त्यानुसार सोमवारी सकाळी या कार्यालयाच्या बाहेर सापळा रचण्यात आला होता. या सापल्यामध्ये हे दोन्ही अधिकारी अलगदपणे अडकले. अटक केलेल्या मध्ये वर्ग 2 चे अधिकारी जाधव आणि वर्ग 3 चा अधिकारी कोळी यांचा समावेश आहे.