ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अहमदाबाद येथील ‘झायडस कॅडिला’च्या कोरोना लसीला लवकरच आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळू शकते. या लसीला परवानगी मिळाल्यास 12 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी ही देशातील पहिली लस ठरेल.
झायडसने जगातील पहिली डीएनए बेस्ड कोरोना लस बनवली असून, ती कोरोनावर 77 टक्के प्रभावी असल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे. भारत सरकार लवकरच या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देऊ शकते. या लसीला परवानगी मिळाल्यास भारतात वापरली जाणारी ही सहावी लस असेल. भारतात सध्या सीरमची ‘कोविशिल्ड’, भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ आणि रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ लसींचा वापर केला जातो. तर अमेरिकेच्या ‘मॉडर्ना’ आणि ‘जॉन्सन ऍन्ड जॉन्सन’ला आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे.