हॉलमार्क युनिक आयडीला सराफांचा विरोध
प्रतिनिधी / सांगली
देशातील सराफांना युनिक आयडी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. सराफांनी हॉलमार्कचे स्वागत केले आहे. परंतु या युनिक आयडीला सराफांनी विरोध दर्शवला आहे. ही युनिक आयडी प्रक्रिया विध्वंसक आहे असे त्यांचे मत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इन्स्पेक्टर राज येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
युनिक आयडी प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी देशभरातील सराफांनी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व सराफांनी सहभाग घेत हा बंद शंभर टक्के यशस्वी केला आहे. सोमवारी सर्व सराफ कट्टा बंद होता.