कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ केली होती फोडाफोडी
प्रतिनिधी / मिरज
कर्नाटकातील बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबन प्रकरण शहरात कर्नाटकची वाहने फोडल्याप्रकरणी नऊ शिवसैनिकांनी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱयांचा जमावबंदी आदेश लागू असताना बेकायदेशीर जमाव करुन दगडफेक केल्याचा ठपका शिवसैनिकांवर ठेवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेनेचे मिरज शहराध्यक्ष चंद्रकांत रामू मैगुरे, विजय चंद्रकांत शिंदे, माजी उपशहर प्रमुख किरण धोंडीराम कांबळे, पप्पू शिवाजी शिंदे, महादेव भागेजी हुलवान, अतुल अनिल रसाळ, गजानन धोंडीराम मोरे, दिलीप बबलू नाईक आणि शाखा प्रमुख प्रकाश शिवराम अहिरे या नऊ शिवसैनिकांचा समावेश आहे.