संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले लसीकरण केंद्र, 200 लसींपैकी केवळ दोघांनाच लस
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील बेळंकी येथे ग्रामीण रुग्णालयात कर्नाटकातील नागरिकांचे लसीकरण सुरू असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ घालत ते बंद पाडले.
ग्रामीण रुग्णालयाला एकूण दोनशे लसी मिळाल्या होत्या. त्यापैकी गावातील दोघांनाच लस देण्यात आली. उर्वरीत लाभार्थी हे कर्नाटक आणि इतर गावातील असल्याने बेळंकीतील ग्रामस्थ संतप्त झाले. आधी स्थानिक नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण न झाल्यास एकालाही लस टोचू देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.