प्रतिनिधी / जत
जत तालुक्यात गेली दोन महिने आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढतो की काय अशी शंका निर्माण झाली आहे. शनिवारी तालुक्यात कोरोनाचे नऊ रुग्ण मिळून आले आहेत. तालुक्यातील वालेखिंडी येथे चार तर बिळूर येथे पाच रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान, तालुक्यात आज अखेर रुग्णांची संख्या 2079 इतकी असून, 1966 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या उपचारासाठी 38 रुग्ण दाखल आहेत. तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाकडे दुर्लक्ष न करता शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे, मास्क वापरणे बंधनकारक आहे. 10 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. त्याचे उलन्घन करू नये, यात्रा, जत्रा, गर्दीचे कार्यक्रम करू नयेत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.