प्रतिनिधी / सांगली
गुरुवारी जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्येचा अक्षरशः उद्रेक झाला. दिवसभरात तब्बल ९२१ नवे रुग्ण सापडले. तर १७ रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. वाळवा तालुक्यात सर्वाधीक १७९ तर महापालिका क्षेत्रात १९३ रुग्ण सापडले. यामध्ये सांगली शहर १३० तर मिरज शहरातील ६३ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान २४५ रुग्णांनी मात्र कोरोनावर मात केली. तर ७३७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान जिल्ह्यात उपचारखालील असणाऱ्या रुग्ण संख्या ५ हजार ५२८ इतकी झाली आहे. कोरोना रुग्ण संख्येबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
आजचे रुग्ण ९२१
मृत्यू १७
बरे २४५
उपचार सुरू ५५२८
चिंताजनक ७३७