1145 कोरोनामुक्तः महापालिका क्षेत्रात 271 वाढलेः ग्रामीण भागात 1562 वाढले
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक कोरोना रूग्ण वाढले आहेत. एकाच दिवशा एक हजार 833 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रूग्णसंख्येचा आकडा 83 हजार 319 इतका झाला आहे. तर उपचार सुरू असणाऱया 44 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचा दरही वाढू लागला आहे. ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. महापालिका क्षेत्रात 271 वाढले तर ग्रामीण भागात एक हजार 562 रूग्ण वाढले. उपचारात सध्या 14 हजार 746 रूग्ण आहेत.
महापालिका क्षेत्रात 271 वाढले
महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसून येत नसल्याने आठ दिवस जनता कफ्यू जाहिर करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात सातत्याने रूग्णांची वाढ दिसून येत चालली आहे. बुधवारी महापालिका क्षेत्रात 271 रूग्ण आढळून आले त्यामध्ये सांगली शहरात 139 तर मिरज शहरात 132 इतके रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 23 हजार 656 रूग्ण बाधित झाले आहेत. त्यातील 71 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 1562 रूग्ण वाढले आहेत
महापालिका क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे. तो कमी होण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत चिंतेचे वातावरण आहे. एकाच दिवशी ग्रामीण भागात एक हजार 562 रूग्ण वाढले आहेत. आटपाडी तालुक्यात 136, कडेगाव तालुक्यात 119, खानापूर तालुक्यात 121, पलूस तालुक्यात 89, तर तासगाव तालुक्यात 159 रूग्ण आढळून आले आहेत. जत तालुक्यात 270, कवठेमहांकाळ तालुक्यात 156, मिरज तालुक्यात 290 तर शिराळा तालुक्यात 78 आणि वाळवा तालुक्यात 144 रूग्ण आढळून आले आहेत.
44 जणांचे मृत्यू
जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाणही कमी होताना आढळून येत नाही. बुधवारी उपचार सुरू असणाऱया 44 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सांगली शहरातील 6 तर मिरज शहरातील चार आणि कुपवाड शहरातील दोघा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कडेगाव आणि खानापूर तालुक्यात प्रत्येकी चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यात तीन, तासगाव तालुक्यात पाच तर जत तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातील एकाचा तर मिरज तालुक्यातील दोन जणांचा आणि वाळवा तालुक्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शिराळा तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे.
1145 कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱया रूग्णांच्या संख्येतही मोठयाप्रमाणात वाढ होत चालली आहे. ही मात्र जिल्ह्यासाठी थोडीशी दिलासा देणारी गोष्ट आहे. बुधवारी उपचार सुरू असणारे एक हजार 145 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर 66 हजार 100 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
नवे रूग्ण 1833
उपचारात 14746
बरे झालेले 66100
एकूण बाधित 83319
मृत्यू 2473
बुधवारचे तालुकानिहाय बाधित रूग्ण
आटपाडी 136
कडेगाव 119
खानापूर 121
पलूस 89
तासगाव 159
जत 270
कवठेमहांकाळ 156
मिरज 290
शिराळा 78
वाळवा 144
सांगली शहर 139
मिरज शहर 132
एकूण 1833
आजचे लसीकरण 6031
आजअखेर लसीकरण 572324