प्रतिनिधी / तासगांव
तासगांव येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे वसतीगृहात उभारण्यात आलेल्या सर्व सोयींनी युक्त अद्ययावत कोविड केअर सेंटरचे उद्घाटन सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल माळी, तासगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, डॉ. विजय जाधव, नगरसेवक जाफर मुजावर, नगरसेवक बाळासाहेब सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
याच वेळी तासगांव शहरातील सर्व डॉक्टर आणि मेडिकल स्टाफसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेला डॉ. सुबोध उगाणे सर यांनी सर्व डॉक्टर आणि स्टाफला मार्गदर्शन केले.