वार्ताहर/बागणी
बागणी येथील रवींद्र चव्हाण यांच्याकडे काकाचीवाडी व बागणी येथील दोन रेशनिंग दुकान चालवण्यास होती. कोरोना काळात सरकारने मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम सुरू केल्यानंतर रेशन दुकानात कमी धन्य देत असल्याची तक्रार पुरवठा अधिकारी यांच्याकडे गेली असल्याने त्यांनी यावर त्वरित लक्ष देत दुकानातील पावत्या व धान्याची आवक जावक तपासली असता यामध्ये घोळ आढळून आल्याने त्यांनी दोन्हीं दुकाने सील केली आहेत. पुरवठा अधिकारी बबन करे, मंडल अधिकारी प्रफुल्ल माळवदे, तलाठी गुरव, सरपंच प्रमोद माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.
लॉकडाऊनच्या कालावधीत लाभार्थ्यांना नियमानुसार रेशन धान्य मिळत नसल्याची तक्रार नागरीकांनी केली होती. त्याची दखल तालुका पुरवठा विभागाने घेत बागणी येथिल परवाना धारक रविंद्र दत्तात्रय चव्हाण यांचा बागणी, काकाचीवाडी येथील दोन्ही स्वस्त धान्य दुकान परवाना क्रमांक १५६ / २००३ चा परवाना रद्द करून ‘एक लाख ऐकवीस हजार’ दंड करण्यात आला. गेली कित्येक वर्षे तोंड तांबुन बुक्क्याचा मार सहन करीत आलेल्या काकाचीवाडी येथील नागरीकांनी दुकानदार विरोधात तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार देत प्रमाणापेक्षा धान्य कमी घालणे, खरेदी मालाच्या पावत्या न देणे, हे तक्रारीचे स्वरूप होते. संबंधित अधिकारी वर्गाने घटनास्थळी भेट देताच संबधित अहवाल वरिष्ठांना पाठवून दप्तर तपासणी मध्ये काही त्रुटी आढळुन आल्यावर लाभार्थीसाठी आलेले धान्यचा आणि विकलेल्या धान्याचा ताळेबंद लागत नसल्याचे ग्रुहीत धरूनच तालुका पुरवठा विभगाने परवाना रद्द केला असल्याची माहिती पुरवठा अधिकारी यांनी दिली.
दरम्यान इथून पुढे बागणी येथील दुकान माळवाडी मजूर सोसाईटीला वर्ग केले आहे. आणि काकाचीवाडी येथिल के. जी. पिरजादे या दुकानदाराकडे तात्पुरते चालवण्यासाठी दिले आहे.