बाळेकुंद्री / वार्ताहर
लहान बहिणीला वाचविताना मोठ्या बहिणीने आपले प्राण गमावल्याची घटना कित्तूर तालुक्यातील तिगडोळी गावात रविवारी घडली आहे .संजोता गुंडाप्पा जायकन्नावर (वय २२ )असे मयत झालेल्या दुर्दैवी कॉलेज विद्यार्थिनीचे नाव आहे .या घटनेमुळे तिगडोळी गावावर शोककळा पसरली आहे.संजोता ही नुकतीच केपीएस व पीएसआय परीक्षा दिली होती.तिचे स्वप्न हे अधुरेच राहिले आहे.
याविषयी कित्तूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की चिगडोळी गावचा शेतकरी गुंडाप्पा जायकनवर यांनी आपल्या निवासस्थानी बांधलेल्या शेडमध्ये घातलेल्या विद्युत तारेला लहान मुलीचा स्पर्श झाला .तिने एकदमच किंकाळी केली. सदर किंकाळी घरात असलेली तिची बहीण संजोता हिने ऐकली व त्या ठिकाणी धाव घेतली.व तातडीने घरातून पाणी आणण्यासाठी जात असताना अचानक पाय घसरून सर्व्हिस तारेवर पडल्याने तिचा विद्युत धक्का लागून तिचा जागीच मृत्यू झाल्याचे कित्तूर पोलिसांनी सांगितले . घटनास्थळी कित्तूर हेस्कॉमचे अधिकारी व व पोलिसांनी जाऊन पहाणी केली.कित्तूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे