वार्ताहर / म्हैसाळ
म्हैसाळसह परिसरात प्रथमच कोणाचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थांतून घबराट निर्माण झाली आहे. सदरची व्यक्ती गावातील दरगा (तक्का) परीसरातील आहे .सलग तीन-चार दिवस सर्दी व ताप आल्याने सदरची व्यक्ती गावामध्ये एका डॉक्टरकडे उपचार घेत होती. दरम्यान, सदर व्यक्तीचे स्वॅब तपासणी केली असता पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे गावात खळबळ निर्माण झाली आहे. गेले दोन तीन दिवस याबाबत चर्चा सुरू होती मात्र आता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात घबराट पसरली आहे.
सदर व्यक्तीच्या घरातील सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतली असल्याचे आरोग्य केंद्र अधिकारी डॉ.खंदारे यांनी सांगितले. याशिवाय ज्या डॉक्टरकडे सदरची व्यक्ती उपचार घेत होती त्या डॉक्टरचा दवाखाना ही दोन दिवसा पूर्वीच सील करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरला व या दोन चार दिवसात जे जे पेशंट उपचारांसाठी आले होते त्यांचे पेपरस ही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
दरम्यान गेल्या चार-पाच महिन्यापासून गावात कोरोणाचा एकही रुग्ण आढळला नव्हता यासाठी ग्राम स्तरावर शासन आदेशानुसार लॉकडाऊन व जनता कर्फ्यू लागू करण्यात आले होते.
वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोणा प्रतिबंध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शेवटपर्यंत कोरोणाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध प्रयत्न करणेत आले होते. पण शेवटी कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थांतून घबराट पसरली आहे. सदरचा परिसर कंटेन्मेट झोन जाहीर करून सील करण्यात आले आहे. दरम्यान ज्यांचे स्वॅब तपासणी साठी घेतली आहेत त्यांचे रिपोर्ट काय येतात इकडे गावचे लक्ष लागले आहे.