राष्ट्रवादी काँग्रेसच खरा जातीयवादी पक्ष असल्याची नगरसेविका स्वाती पारधींची टिका
प्रतिनिधी / सांगली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच खरा जातीयवादी पक्ष आहे. पक्षाचे राष्ट्रवादीचे मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे यांच्याकडून मिळत असलेल्या हीन दर्जाच्या वागणुकीमुळे राष्ट्रवादीच्याच नगरसेविका स्वाती पारधी यांना राजीनामा दयावा लागला. या निषेर्धात सांगलीत भाजपा अनुसूचित जाती जमाती युवा मोर्चा तर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादीचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना ज्योती कांबळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आदिवासी समाज व मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ते व नगरसेवकांवर सातत्याने अन्याय होत आहे. जाती वाचक शिवागीळ होत आहे. या अन्यायाला कंटाळून आदिवासी समाजाच्या सर्वसामान्य नगरसेविका स्वाती पारधी यांनी गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्याच प्रभागात मागासवर्गीय नगरसेवक योगेंद्र थोरात यांचेवर ही मागासवर्गीय म्हणुन सातत्याने त्यांचावर अन्याय होत असलेले त्यांच्याकडून सांगितले जात आहे. तरी खरा जातीयवादी पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. यावेळी संघटक दीपक माने यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.