प्रतिनिधी / मिरज
रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणातील आरोपी मिरज सिव्हिलमधील अधिपरीचालक सुमित हुपरीकर याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. इंजेक्शनचा काळाबाजार प्रकरणी निलंबनाची ही पहिलीच कारवाई आहे. दरम्यान, रेमडेसिवीरची आणखी काही इंजेक्शन गायब झाले असून, त्याची अंतर्गत चौकशी सुरू आहे.
मिरज शासकीय रुग्णालयातून रेमडेसिवीर इंजक्शन चोरून काळाबाजार करणाऱ्या सुमित हुपरीकर यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने अहवाल दिल्यानंतर हुपरीकर याच्या निलंबनाचे आदेश अधिष्ठातांनी दिले होते. या आदेशानुसार हुपरीकर याला निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालयातील साठ्यातून आणखी रेमडेसिवीर इंजेक्शन गायब असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित कर्मचार्यांची अंतर्गत चौकशी सुरु आहे. इंजेक्शन काळाबाजार प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय असून यातील सूत्रधार व इतरांवर कारवाईची मागणी होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार
मिरज शासकीय रुग्णल्यातून एकूण १२ इंजेक्शन गायब असल्याने सिव्हिल प्रशासनाकडून पाच ते सहा कर्मचार्यांची अंतर्गत चौकशी सुरू आहे. यात पुरुष व महिला कर्मचारी सहभागी असल्याची शक्यता आहे.