सांगली / प्रतिनिधी :
आज दि. 29 जुलै 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता वारणा धरणाची पाणी पातळी 624.30 मी.झाली असून धरणामध्ये 31.34 TMC पाणीसाठा झाला आहे. धरण 91.21% भरले आहे.
धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि. 29 जुलै 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता वक्रदरवाजे व विद्युत गृहातून सध्या सोडत असलेला एकूण 9780 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडणेत येत आहे. तो वाढवून 14980 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडणेत येणार असल्याने वारणा नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. अशी माहिती वारणा धरण व्यवस्थापन यांच्या वतीने देण्यात आली आहे.