प्रतिनिधी / सांगली :
सांगली महापालिका क्षेत्रांतील विजयनगर या उपनगरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पेठभाग येथील सहकारी बँकेत काम करणाऱ्या एकास कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी सकाळी त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी छाती भरल्याने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या कुटुंबातील 5 जणांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सांगलीत आता कोरोनाचा आकडा हा 27 वर गेला आहे. यातील 25 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
विजयनगर भागातील सिद्धी विनायक सोसायटी मध्ये ती व्यक्ती राहते, 47 वर्षीय असणारी ही व्यक्ती आठ दिवसापासून आजारी आहे. या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटूंबातील 5 जणांचे स्वॅब तातडीने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा आकडा एकने वाढला आहे.