प्रतिनिधी / शिराळा
शिराळा येथील तात्यासो भांडवले यांच्या औढी रस्त्यावरील यादव मळ्यातील जनावरांच्या गोठ्यास आग लागून पाच जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे.यामध्ये एक खिल्लार जातीचा बैल, दोन गाभण म्हैशी, वासरू आणि एका रेडीचा समावेश आहे. एक म्हैस वाचली असून, गंभीर रित्या भाजली आहे.
रात्री उशीरा पर्यंत आग विझवण्याचे काम चालू होते. जनावरांचे शेड, पिंजर, शेती औजारे असे अंदाजे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. माणुसकीच्या नात्याने समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन भांडवले कुटुंबाला मदत गोळा करण्यास सुरुवात केली आहे.