प्रतिनिधी / नागठाणे :
अपशिंगे (मि.) ता.सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील यशस्वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी निवृत्त शिक्षणाधिकारी वाय. आर. निकम, उपसरपंच उमेश निकम, अजित निकम, विजय निकम, राजश्री करांडे, नीरजा माेरे, अधिक निकम, सविता गडांकुश, राजेंद्र कणसे, मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात साहिल जाधव, हर्षवर्धन देशमुख, आर्या पवार, केदार देशमुख, ईशा कुंदप, शंभूराज कणसे, पृथ्वीराज काेळेकर, अपूर्वा कदम, निर्मिती शिवदास, अनुजा निकम या यशस्वी विद्यार्थ्यांचा गोैरव करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांसह सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी जयश्री गुरव, केंद्रप्रमुख रामचंद्र गायकवाड तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.