सोनिपत येथे उपचार सुरू
औंध/ प्रतिनिधी
महाराष्ट्राचा लाडका मल्ल, जागातिक कांस्यपदक विजेता अर्जुनवीर राहुल आवारेने अखेर कोरोनाला नमवले आहे. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. राहुल आवारे यांच्या बंधूंचे नाशिकच्या पोलीस अकादमीत पोलीस उपाधिक्षक पदाचे प्रशिक्षण घेत असलेला राहुल 29 ऑगस्ट रोजी अर्जूनवीर पुरस्कार स्विकारण्यासाठी पुण्यात आला होता. पुरस्काराचा कार्यक्रम उरकून त्याने बीड (पाटोदा) येथे लहान भाऊ पै. गोकुळ आवारे यांच्या लग्नासाठी हजेरी लावली होती.
त्यानंतर तो थेट सोनिपत (हरियाणा) येथे राष्ट्रीय कुस्ती सराव शिबिरासाठी गेला होता. प्रवासाच्या दगदगीमुळे त्याची प्रकृती बिघडली होती. चाचणी केल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले होते. राहुलला कोरोना झाल्यामुळे तमाम कुस्ती शौकीन आणि चाहत्यांना काळजी लागली होती. मात्र आज अखेर त्याने कोरोनाला नमवले.
लवकरच सराव शिबिरात सहभागी होईन.
सध्या मला कोणतीही लक्षणे नाहीत. माझे स्वास्थ उत्तम आहे. सध्या मी सोनिपत येथे उपचार घेत आहे. आँलम्पिकचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मी लवकरच राष्ट्रीय सराव शिबिरात सहभागी होणार आहे.माझ्या तमाम चाहत्यांच्या व गुरुंच्या अपेक्षा मला पूर्ण करायच्या आहेत. सर्वोत्तम कामगिरी बजावण्यासाठी मला सरावावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. अर्जुनवीर राहुल आवारे.