छत्रपती उदयनराजेंनी केले अभिनंदन
देशमुख नगर / वार्ताहर :
अवघ्या साडेतीन वर्षाच्या राध्यनी राहुल देवतळे नांदेड सिटी, पुणे हिने सुर्यमाले विषयीच्या ज्ञानाच्या जोरावर जागतिक विक्रम केला. सुर्यमालेसंबंधी ४५ प्रश्नांची उत्तरे केवळ तीन मिनिटे पन्नास सेकंदात देत तिने इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरले. एवढ्या कमी वयात हा विक्रम करणारी ती पहिली भारतीय मुलगी ठरली आहे.
राध्यनी सध्या नांदेड सिटीच्या पवार पब्लिक स्कूलच्या नर्सरी वर्गात ऑनलाईन शिक्षण घेत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजली गुर्जर सांगतात की, टीचर डे रेकॉर्ड बद्दल आमच्या शाळेला व मला अभिमान वाटतो.
सातारचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत नांदगावचे माजी उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ सातारा भरत देशमुख हे उपस्थित होते.