सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील एलआयसी कॉलनीत राहणारी 34 वर्षीय महिला आणि तिच्या 12 आणि 6 वर्ष वयाच्या दोन मुली दि.25 पासून बेपत्ता आहेत.
अंजली किशोर कांबळे (वय 34) रंग गोरा, उंची 5 फूट 5 , चेहरा गोल, नाक सरळ, डोळे काळे, मध्यम बांधा, अंगात निळ्या रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगीज, पायात पिवळ्या रंगाची चप्पल तर श्रुतिका बाळू कांबळे वय 12, रंग सावळा, उंची 4 फूट 8, चेहरा उभा,नाक सरळ, डोळे काळे, मध्यम बांधा आणि नेत्रा बाळू कांबळे (वय 6) रंग सावळा, उंची 4 फूट,चेहरा गोल, नाक सरळ, डोळे काळे बांधा मद्यम असून, या आढळून आल्यास शाहूपुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन शाहूपुरी पोलिसांनी केले आहे.