आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी / सातारा :
राज्यात लॉकडाऊन असल्याने सातारा आगारातील 45 बसेस या मुंबईतील बेस्टचा उपक्रम राबण्यासाठी देण्यात येणार होत्या. मात्र, मुंबईत वाढत चालेल्या कोरोनाचा प्रार्दुभाव पहाता सातारा विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी आमदार शिवेंद्रराजेंकडे बेस्ट उपक्रमातंर्गत सेवेसाठी पाठवू नये, अशी विनंती केली होती. त्यानंतर आमदार शिवेंद्रराजेंनी थेट राज्य परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चन्ने यांना पत्राद्वारे सातारा विभागातील कर्मचाऱ्यांना या उपक्रमातून वगळण्याची विनंती केली होती. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश आले असून, सातारा विभागातील कर्मचाऱ्यांना आता बेस्ट उपक्रमातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले.
बेस्ट उपक्रमासाठी दि.16 मे पासून सातारा विभागातील 45 बसेस व कर्मचारी हे दिंडोशी आगारात कार्यरत राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार इंटक संघटनेचे एम.के.भोसले, युवराज जाधव, दिलीप निकम यांनी आमदार शिवेंद्रराजेंच्याकडे मागणी केली होती.