सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील प्रभाग 6 मध्ये कुंभारवाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून हरिजन, गिरीजन सोसायटीचे ड्रेनेजचे पाणी निकामी झालेल्या पाईपलाईनमधून वाहत आहे. दुर्गंधी निर्माण होत आहे. त्यामुळे कुंभारवाडा परिसरात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी गणेश कुंभार, राजेंद्र कुंभार, सुनिल कुंभार, शिवाजी कुंभार, ज्ञानदेव कुंभार आदी उपस्थित होते.