प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात कोरोनाचा कहर वाढत असताना रविवारी रात्रीच्या अहवालात 629 बाधित समोर आले. हजारांच्या पुढे येणारी संख्या नसल्याने थोडासा दिलासा मिळत असताना मृत्यूदर वाढीचा वेग वाढताच आहे. सोमवारी आलेल्या अहवालात 31 बाधितांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आलीय. तर सातारा तालुका हॉटस्पॉट ठरला असून तब्बल 188 बाधित आढळून आलेले आहेत. कराडमध्ये संख्या घटली असली तरी 52 आहे. तर फलटण, खंडाळा व कोरेगाव तालुक्यात बाधित वाढत असताना जावली, महाबळेश्वर, माण, खटावमध्ये हा वेग कमी येवू लागलाय.
दरम्यान, जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 629 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 31 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
काही ठिकाणी जनता कर्फ्यू
बाधितांचा वाढता आकडा पाहून नागरिकच आता काही ठिकाणी लॉकडाऊन पाळू लागले आहेत. अनेक गावात 10 दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात येत असून नागठाणे जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. जावली तालुक्यात लॉकडाऊन सुरु करण्यात आल्यानंतर बाधित वाढण्याची गती मंदावली आहे. काहीही असो मात्र आता कोरोना स्थितीचा सर्वांनाच कंटाळा आलाय. भीतीच्या छायेखाली जगावे लागत असल्याने कोरोना जा बाबा आता लवकर अशीच सर्वांची भावना झालीय. या सर्व परिस्थिती आरोग्य विभागाकडून कोरोनाविरुध्दची लढाई जारी असली तरी ज्यावेळी नवीन बाधित येणारच नाहीत तेव्हाच खरा दिलासा मिळणार आहे.
सातारा व कराडला सावरावे लागेल
सातारा तालुका 4 हजार 903 बाधितांचा आकडा असला तरी 173 जणांचा बळी गेलाय. तर कराड तालुक्यात एकूण बाधितांची संख्या 5 हजार 968 मोठी असली तरी तिकडे 116 जणांचा बळी गेला. जिल्हय़ात सातारा तालुक्यात बळींचा आकडा मोठा असून जिल्हय़ातील 690 बळींपैकी सातारा व कराड तालुक्यात निम्मे 289 कोरोना बळी गेले आहेत. जिल्हय़ाचा एकूण आकडा 700 उंबरठयावर उभा असून मृत्यूदर वाढत असल्याने जनता आणखीन पॅनिक झालीय.
कोरानाबाधित अहवालामध्ये
सातारा तालुका 188 बाधित
सातारा 27, सोमवार पेठ 2, शनिवार पेठ 5, गुरुवार पेठ 3, रविवार पेठ 8, शुक्रवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, करंजे पेठ 4, सदरबझार 12, मल्हारपेठ 1, गोडोली 5, शाहुनगर 2, शाहुपुरी 10, कामाठीपुरा 1, संगमनगर 3, कृष्णानगर 1, संभाजीनगर 2, सैदापूर 3, तामजाईनगर 3, मोळाचा ओढा 6, केसरकर पेठ 1, गडकरआळी 3, कोडोली 2, शेंद्रे 5, चिंचणेर निंब 1, सोनगाव 1, धावडशी 2, महागाव 3, म्हसवे 1, माहुली 2, हरपळवाडी 1, खेड 5, कळंबे 1, लिंब 2, वनवासवाडी 1, पाडळी 2, अंगापूर 1, निनाम पाडळी 1, काशीळ 1, कोंडवे 1, राधिका रोड सातारा 1, खेड 1, वाढेफाटा 1, सदाशिव पेठ सातारा 3, जरंडेश्वर नाका सातारा 3, कोंढवे 1, पाटखळ 1, वाढे 2, नागठाणे 3, आंबेधरे 2, माची पेठ सातारा 1, प्रतापगंज पेठ सातारा 1, यादोगोपाळ पेठ 1, नुने 1, निगडी 1, वेचले 1, एमआयडीसी 2, दौलतनगर सातारा 1, सदाशिव पेठ 1, शेरेवाडी 1, गोवे 1, विसावानाका 1, गोडसे वस्ती 1, शहापुर 1, चिंचणेर वंदन 17.
कराड तालुका 52 बाधित
कराड 5, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 2, शुक्रवार पेठ 1, विद्यानगर 2, कार्वे नाका 2, मलकापूर 1, आगाशिवनगर 1, शिरवडे 1, येळगाव 5, उंब्रज 3, उंडाळे 5, येरवले 2, कुसुर 1, काले 2, वहागाव 2, कालवडे 1, शेणोली 2, विजयनगर 2, रेठरे बु 1, चरेगाव 1, कोरेगाव 1, आटके 1, पाली 1, कोयना वसाहत 1, तांबवे 2, जिंती 1, बनवडी 1, बेलवडे 1.
वाई तालुका 59 बाधित
पाचवड फाटा 1, गणपती आळी 2, यशवंतनगर 2, पसरणी 3, गंगापुरी 9, गुळुंब 1, धर्मापुरी 4, किकली 1, मेणवली 1, भुईंज 2, सिद्धनाथवाडी 3, पाचवड 2, बोधेवाडी 2, वेळे 15, सर्जापुर 1, अभेरी 1, ओझर्डे 9, फुलेनगर 1, बोपेगाव 2, कवठे 1, उडतारे 1.
फलटण तालुका 84 बाधित
फलटण 10, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 4, रविवारपेठ 5, स्वामी विवेकानंदनगर 2, लक्ष्मीनगर 3, सासपडे 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 4, सोमवार पेठ 1, आसू 6, हिंगणगाव 1, घाडगेमळा 1, जिंती 5, विडणी 3, कोळकी 8, साखरवाडी 1, पवार वाडी 3, निंबळक 1, तरडफ 1, चौधरवाडी 1, कुठे 1, पाडेगाव 5, गिरवी 1, रावडी 1, वाघोशी 2, जिंती नाका 1, निरगुडी 1, मलटण 1, धुळदेव 1, वाठार निंबाळकर 1, तामखंडु 1, आसू 5.
खंडाळा तालुका 65 बाधित
खंडाळा 15, चौफुला 1, खेड बु 3, लोणंद 17, शिरवळ 3, कोपर्डे 5, बावडा 7, शिरवळ सी. सी. सी. 8, वहागाव 2, पवार वस्ती 3, आम्रळ 1, गोटेघर 3.
कोरेगाव तालुका 45 बाधित
कोरेगाव 6, करंजखोप 3, सातारारोड 4, नांदवळ 1, वाठारस्टेशन 3, शेंदूरजणे 5, पिंपोडे बु 1, दहिगाव 3, भादळे 1, सोनके 1, राऊतवाडी 2, तादुळवाडी 1, अटेवाडी 2, किरोली 1, आर्वी 2, धामणेर 5, कुमठे 2,तडवळे 1.
खटाव तालुका 7 बाधित
खटाव 5, वडूज 9, औंध 1, तडवळे 10, आंबवडे 1, मायणी 3, माहुली 1, राजाचे कुर्ले 13, शेनवडी 3, सिद्धेश्वर कुरोली 3, पळशी 2, आमलेवाडी 3, जाखणगाव 3, वांजोळी 8, पळसगाव 1, तुपेवाडी 3, चितळी 1, शेनवडी 1, वाकेश्वर 1.
माण तालुक्यात 13 बाधित
जाधववाडी 1, पिंगळी 1, दहिवडी 3, म्हासाळवाडी 1, स्वरुपखानवाडी 7.
जावली तालुक्यात 2 बाधित : कुडाळ 1, सोमवाडी 1.
पाटण तालुका 6 बाधित : साईकडे 5, चाफळ 1.
महाबळेश्वर तालुका 6 बाधित :महाबळेश्वर 6.
इतर 5 : बाहेरील जिल्ह्यातील वाळवा 1, ताईघाट 1, बोंडारवाडी 1, तापोळा 14.
जिल्हयातील 31 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय सातारा येथे वर्णे सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, संगमनगर 53 वर्षीय पुरुष, राऊतवाडी 76 वर्षी पुरुष, देशमुखनगर 47 वर्षीय महिला, चिंचणेर 48 वर्षीय पुरुष, शाहुपुरी 76 वर्षीय महिला, दत्तनगर 60 वर्षीय महिला, तारगाव 73 वर्षीय महिला, सातारा 64 वर्षीय पुरुष, सातारा 72 वर्षीय महिला, बेलवडे ता. कराड 80 वर्षीय पुरुष, ल्हासुर्णे कोरेगाव 69 वर्षीय पुरुष, कोपर्डे कराड येथील 70 वर्षीय पुरुष, तांबवेवाडी कोरेगा येथील 45 वर्षीय महिला, कराड येथील 55 वर्षीय पुरुष, विविध हॉस्पीटलमध्ये दाखल असणाऱयांमध्ये विसापूर ता. खटाव 45 वर्षीय पुरुष, येरळवाडी ता. खटाव 76 वर्षीय पुरुष, दारुज ता. खटाव येथील 67 वर्षीय पुरुष, निनाम पाडळी सातारा 59 वर्षीय पुरुष, शाहुपुरी सातारा 56 वर्षीय पुरुष, घिगेवाडी ता. कोरेगाव 75 वर्षीय महिला, पाडाळी ता. सातारा 63 वर्षीय महिला, सातारा 63 वर्षीय पुरुष, कराड येथील 70 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 73 वर्षीय पुरुष, शालगाव ता. कडेगाव 85 वर्षीय पुरुष, संगमेशनगर फलटण 61 वर्षीय पुरुष, गोडोली सातारा 72 वर्षीय महिला, तारळे ता. पाटण 72 वर्षीय पुरुष, मलकापूर कराड येथील 65 वर्षीय पुरुष, किन्हई ता. कोरेगाव 60 वर्षीय पुरुष, असे एकूण 31 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 56160
एकूण बाधित 24578
एकूण कोरोनामुक्त 14833
मृत्यू 690
उपचारार्थ रुग्ण 9055