कामे मार्गी लावण्याच्या त्यांनी दिल्या सूचना
पंचायत समितीच्या सदस्यांना ही चढले होते स्फुरण
कराड आणि वाई पंचायत समितीच्या सभेत लावली हजेरी
प्रतिनिधी / सातारा
खासदार श्रीनिवास पाटील हे प्रशासनात वाकबगार व्यक्ती म्हणून ओळखले जातात. खासदार असून ही त्यांनी चक्क प्रथमच कराड आणि वाई पंचायत समितीच्या मासिक सभेत ऑन लाईन हजेरी लावली. त्यांनी आढावा घेत कराड आणि वाई पंचायत समितीच्या सदस्यांशी चर्चा करत जी कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागास त्यांनी दिल्या. मासिक सभेला खासदार श्रीनिवास पाटील यांनी हजेरी लावल्याने पंचायत समिती सदस्यांना स्फुरण चढले होते. अनेक सदस्यांनी त्यांच्याकडे रस्त्यांच्या कामाची मागणी केली.