ऑनलाईन टीम / सातारा :
आनेवाडी टोलनाका हस्तांतरण प्रकरणातील गुन्ह्यातून खा. उदयनराजे भोसले यांच्यासह 11 जणांची वाई कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश एम. एन. गिरवलकर यांनी सबळ पुराव्याअभावी ही मुक्तता केल्याचे सांगण्यात येते. यावेळी नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, दत्ता बनकर, राजू गोडसे, बंडा पैलवान, अशोक सावंत, अशोक मोहिते आदी उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह 17 जणांची मागील महिन्यात वाई कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती.