सातारा / प्रतिनिधी :
समर्थमंदीर परिसरात एका व्यक्तीचाअज्ञातांनी धारदार शस्त्रांचा वापर करुन निर्घृण खुन केल्याची घटना 15 डिसेंबरला रात्री घडली होती. मृताच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन विद्रुप केला होता. मात्र, सातारा शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन तासात आरोपींना अटक केली.
बजरंग लक्ष्मण गावडे (रा.मंगळवार पेठ)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खूनप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. हा खून पूर्व वैमनस्यातून केल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पो.उपनिपीक्षक अनिल पाटील, सहा.फौजदार विश्वास कडव,पो.हवा.अजित जगदाळे, पो.हवा.प्रशांत शेवाळे आदी सहभागी होते.