प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हय़ात कडक लॉकडाऊन काळात घरात बसून कोरोनाविरुध्द लढा दिला. तेव्हा कोरोना बाधितांची संख्या नगण्य होती. मार्चपासून सुरु असलेला कोरोना विरुध्दची लढाई आता अंतिम टप्प्यात असताना सातारकरांच्या मनात भीती निर्माण करु लागलीय. 500 च्या पटीत दररोज बाधित आढळून येत असल्याने जनता पॅनिक होवू लागलीय. मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 589 जणांचे अहवाल बाधित आलेले आहेत. तर बुधवारी आलेल्या अहवालात 16 बाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची एकूण संख्या 430 एवढी झाली असून ही चिंताजनक आहे.
2,090 नागरिक होम आयसोलेटेड
कोरोना टेस्टींग वाढवल्याने मोठया प्रमाणावर बाधित सापडत असल्याचे सांगितले जात असले तरी त्यातील 70 टक्के नागरिकांना कोणतीची लक्षणे नसल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे जिल्हय़ात सध्या 2 हजार 90 नागरिक आपल्या घरातच होम आयसोलेट आहेत. मात्र रुग्ण संख्या वाढीचा वेग कमी येत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे तर अनेक डॉक्टर्स बाधित होत असल्याचेही समोर येत आहे. यामुळे ज्यांना कोरोना व्यतिरिक्त आजारांवर उपचार घ्यायचे आहेत त्यांना उपचार मिळण्यास विलंब होवू लागला आहे.
कृतिशील धीराची गरज
प्रशासनाने खासगी हॉस्पिटलमध्ये देखील कोरोना उपचारांची सुविधा केली असली तरी आता बेडस कमी पडू लागले आहेत. त्यामुळे साताऱयात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात 250 बेडची क्षमता असलेले असलेले हॉस्पिलट सुरु करण्याचे काम सुरु झाले आहे. एकूण सर्व स्थिती पॅनिक होवू लागली असताना प्रशासनाने कोरोनाबाबत तो बरा होतो कोणीही घाबरुन जावू नये असे म्हणत बसण्यापेक्षा कृतीशीलतेतून ते दाखवून देण्याची गरज व्यक्त होवू लागली आहे.
कोरोना बळीचे वाढते प्रमाण चिंताजनक
कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही दररोज दोन आकडी होवू लागले असून त्यामुळे जिल्हय़ात भीती पसरु लागली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे ते बाहेर फिरत नसतानाही बाधित कसे होतात असा त्यांच्या नातेवाईकांचा सवाल आहे. त्याला प्रशासनाने सबळ उत्तर देण्याची गरज आहे. मृत्यूदर कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह सातत्याने त्यावर प्रशासन काम करत असल्याचे सांगत असले तरी मृत्यूदराचा रेशो वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरु लागले आहे.
मंगळवारी रात्री उशिरा अहवालात 589 बाधित
जिह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कराड तालुक्यात 153 बाधित
यामध्ये कराड तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, सोमवार पेठ 5, रविवार पेठ 2, मंगळवार पेठ 4, गुरुवार पेठ 2, शिवाजीनगर 1, श्री हॉस्पीटल 3, कृष्णा मेडिकल कॉलेज 4, आगाशिवनगर 6, मलकापूर 6, कापेर्डे हवेली 8, वाखाब 1, केदारवाडी 1, वाखन 1, रेठरे बु 1,मुंडे 2, पेर्ले 4, खुबी 1, ओंड 1, वडगाव 2, श्रद्धा क्लिनीक 1, घानोशी 1, कपील 1, उंब्रज 4, गोळेश्वर 1, शिरवडे 1, वडगाव 1, आटके 1, केसेगाव 1, बनवडी 3 कार्वे 2, विद्यानगर 1, दुशेरे 1, हरपळवाडी 1, शिरवडे 1, करवडी 2, वडगाव हवेली 2, बेलवडे बु 2, गोळेश्वर 2, कोडोली 1, येरवळे 1, विरवडे 1, पाल 7, रेठरे खु 4, उंडाळे 1, नारायणवाडी 1, काले 4, कार्वेनाका 1, सुपने 1, गमेवाडी 1, नंदगाव 1, वारुंजी फाटा 2, चव्हाण नगर वारुंजी 1, मार्केट यार्ड कराड 1
.
सातारा तालुक्यात 107 बाधित
सातारा तालुक्यातील सातारा 31, मंगळवार पेठ 2, शुक्रवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, रवावार पेठ 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, बुधवार पेठ 1, मल्हार पेठ 1, एलआयसी ऑफीस क्वार्टर पोवईनाका 1, संभाजीनगर 5, विलासनगर 1, गोवे 1, निनाम पाडळी 1, वनवासवाडी 4, करंजे पेठ 3, सदरबझार 7, संगमनगर 1, व्यंकटपुरा पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, विलासनगर 1, बॉम्बे रेस्टॉरंट 2, शाहुनगर 1, शाहूपुरी 6, गोडोली 1, बापुजी साळुंखे नगर कोडोली 1, नागठाणे 1, शेळकेवाडी 1, गुलमोहर कॉलनी 1, आयटीआय रोड, सातारा 1, आरळे 1, क्षेत्र माहुली 1, गोळीबार मैदान सातारा 2, खेड 1, पळशी 1, लिंब 1, नेले किडगाव 1, नेले 1, बसाप्पाचीवाडी 4, कामेरी 1, चिंचणेर वंदन 2, सोनगाव 1, जरंडेश्वरनाका, सातारा 1, धनगरवाडी जुनी एमआयडीसी 1, भरतगाव 1, पार्ली 1.
पाटण तालुक्यात 14 बाधित
पाटण तालुक्यातील पाटण 3, मारुल 1, रामपूर 1, अवर्डे 2, तारळे 1, दुताळवाडी 4, होळ 1, तळमावले 1.
कोरेगाव तालुक्यात 62 बाधित
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, बुरुड गल्ली 5, एकंबेरोड 6, रहिमतपूर 1, वाठार किरोली 4, व्यापार पेठ 6, जांब 2, शिवाजीनगर 1, नंदगिरी 1, चिमणगाव 8, वाठार स्टेशन 1, करंजकोप 5, पिंपोडे बु 1, आनपटवाडी 1, चौधरवाडी 5, बर्गेवाडी 1, पाडळी 1, कोया 1, ल्हासुर्णे 1, कटापूर 2, रहिमतपूर 3, साप 1.
माण तालुक्यात 29 बाधित
माण तालुक्यातील म्हसवड 18, इंजबाव 1, मार्डी 1, राणंद 3, माण 1, दहिवडी 1, वडगाव 2, बिदाल 1, कुळुकजाई 1.
खटाव तालुक्यात 42 बाधित
खटाव तालुक्यातील मायणी 18, वडूज 13, गणेशवाडी 2, पुसेसावळी 2, पळशी 1, गुरसाळे 1, बुध 1, पुसेगाव 1, पुसेगाव 1, औंध 3.
फलटण तालुक्यात 47 बाधि
फलटण तालुक्यातील फलटण 7, बुधवार पेठ 2, रविवार पेठ 2, सोमवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1, मलटण 3, मुंजवाडी 3, कोळकी 2, शुक्रवार पेठ 3, निरगुडी 7, सासवड 1, राजाळे 1, झिरपवाडी 2, सस्तेवाडी 2, पवार वस्ती विडणी 1, पिप्रद 1, साखरवाडी 1, विडणी 1, कसबा पेठ 1, बोराटे वस्ती पिपरद 1, बरड 2, जिंती 1, आसू 1.
खंडाळा तालुक्यात 43 बाधित
ङखंडाळाङ तालुक्यातील शिर्के कॉलनी शिरवळ 5, तालीम चौक शिरवळ 5, पिसाळवाडी 1, शिरवळ 6, शिंदेवाडी 1, न्यु कॉलनी शिरवळ 1, फुलेमळा 2, स्टार सिटी शिरवळ 1, पाडेगाव 5, बीरोबा कॉलनी शिरवळ 1, खंडाळा 1, देवघर 1, लोणंद 8, बाधे 2, धनगरवाडी 1, पाडेगाव 1, पाडेगाव 1,
महाबळेश्वर तालुक्यात 28 बाधित
महाबळेश्वर तालुक्यातील गोडोवली पाचगणी 15, पाचगणी 1, संभाजीनगर 1, नगरपालिक 2, एमटीडीसी 1, देवळाली 1, वालवने 2, रांजणवाडी 4, नगरपालिका सोसायटी 1.
वाई तालुक्यात 24 बाधित
वाई तालुक्यातील वाई 2, गणपती आळी 1, गंगापुरी 2, सोनगिरीवाडी 1, यशवंतनगर 1, भुईंज 1, कवटे 7, केंजळ 1, गरवारे वॉल एमआयडीसी 1, रविवार पेठ 3, धनगवाडी एमआयडीसी 1, उरमोडे 1, शेंदूजर्णे 1, ब्राम्हणशाही 1,
जावली तालुक्यातील दरे खुर्द 1, अंबेघर 1.
इतर 12 बाहेरील जिह्यातील मालगाव जि. सांगली 1, वाळवा जि. सांगली 1, नाडे सिटी, पुणे 1, इस्लमापूर 2, पेठ जि. सांगली 1, कोल्हापूर 1, किल्लेमच्छींद्र ता. वाळवा 1, तांबवे ता. वाळवा 2.
जिल्हय़ात 16 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे बुध ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष, माची पेठ सातारा 50 वर्षीय पुरुष, किवळ ता. कराड ा 74 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा 38 वर्षीय पुरुष, आसनगाव ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड 60 वर्षीय पुरुष. तसेच जिल्हयातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये रविवार पेठ वाई 62 वर्षीय महिला, शेंदूरजणे, ता. वाई 80 वर्षीय पुरुष, पसरणी ता. वाई 78 वर्षीय पुरुष, रामडोह आळी वाई 60 वर्षीय महिला, गंगापुरी वाई 83 वर्षीय पुरुष, कुमठे ता. कोरेगाव 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा 83 वर्षीय पुरुष, कोडोली ता. सातारा 53 वर्षीय महिला, भवानी पेठ सातारा 62 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण 55 वर्षीय पुरुष असे एकूण 16 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
जिल्हय़ात बुधवारपर्यंत
एकूण नमुने 45723
एकूण बाधित 15247
एकूण मुक्त 7778
मृत्यू 430
उपचारार्थ रुग्ण 7039
Previous Articleबेंगळूर हिंसाचार: पोलिसांनी जलद कारवाई केली गेली असती तर घटना टळली असती : सिद्धरामय्या
Next Article ‘हे’ प्राध्यापक करणार अयोध्येतील मशिदीचे डिझाईन
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.