पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी घेतला कारभार
प्रतिनिधी / सातारा
शासनाने दिलेल्या आदेशानुसार सातारा तालुक्यातील 15 गावामध्ये प्रशासक नेमले आहेत.पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांच्याकडे सूत्रे आली आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी किरण सायमोते यांनी दिली आहे.
सातारा तालुक्यातील सासपडे आणि संभाजीनगर या ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी पी. बी. साळुंखे, गजवडी आणि खेड या ग्रामपंचायतीवर कृषीचे विस्तार अधिकारी डी. एस. साळुंखे, निगडी, यवतेश्वर या ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी व्ही. आर. धनावडे, सायळी, आलवडी, धावली या ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी एस.ए.राजे, वळसे, विलासपूर या ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी बी.ए.केवटे, कण्हेर, गवडी या ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी शलाका सोनवणे, शेंद्रे ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी एस.जे.झोरे, कारंडवाडी ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी ए.एन.काकडे, संगममाहुली ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी आर.एस.दळवी यांची नियुक्ती झाली असल्याचे गटविकास अधिकारी किरण सायमोते यांनी सांगितले.