जिल्ह्यातील तिघांचा बळी, जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु
प्रतिनिधी/सातारा
कोरोनाचा कहर अद्याप कमी आलेला नाही. त्यातच आता कोरोना नंतरच्या म्युकर मायकेसिस या रोगाचा धोका वाढू लागला आहे. जिह्यात आतापर्यंत 3 जणांचा बळी गेला असून 28 जण बाधित आढळून आल्याने जिल्हाधिकाऱयांच्या सुचनेनुसार नुकतीच एक बैठक पार पडली. त्या बैठकीनुसार जिल्हाधिकाऱयांच्या स्वाक्षरीने एक परिपत्रक काढण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र म्युकर मायकोसिस कक्ष सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोनाने अगोदरच अनेकांचे जीव रुग्णालयातच तडफडून जात आहेत. त्यातून बरे होवून घरी जाणाऱयांना म्युकर मायकोसिस या आजाराची लागण होत असल्याचा निष्कर्ष पुढे येवू लागला आहे. त्यामुळे सातारा जिह्यात चिंतेचे वातावरण बनले आहे. जिह्यात आतापर्यंत 28 रुग्ण म्युकरमायकोसिसचे आढळून आले. त्यामध्ये 9 रुग्ण हे जिल्हा रुग्णालयात तर 21 रुग्ण हे खाजगी रुग्णालयात दाखल आहेत. मृत्य झालेल्या तीन रुग्णांपैकी 2 हे जिल्हा रुग्णालयातील तर 1 रुग्ण हा खाजगी रुग्णालयात मृत्यूमुखी पडला आहे. कोरोना बाधित झालेल्यांना हा बुरशीजन्य आजार वाढत असल्याचे समोर आल्याने जिह्याची आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे.
जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱयांची बैठक
म्युकरमायकोसिस या आजाराच्या अनुषंगाने नुकतीच जिह्यातील खासगी डॉक्टर, सरकारी डॉक्टर, नाक-कान-घसा तज्ञ, डोळÎाचे तज्ञ, पॅथॉलॉजीस्ट, फिजिशीयन यांची बैठक झाली. त्यामध्ये म्युकर मायकेसिवर उपचार करण्यासाठी चर्चा झाली. तसेच जिल्हाधिकाऱयाच्या स्वाक्षरीने एक परिपत्रक सर्वच हॉस्पिट्लना गेलेले असून त्या आजारावरील रुग्ण आढळून आल्यास त्यांच्याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेला माहिती देणे बंधनकारक आहे.
जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिस कक्ष
म्युकर मायकोसिस या आजारावर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात कक्ष तयार केला आहे. त्याचप्रमाणे याच्या तपासणीसाठी जी बायप्सी घ्यावी लागते, ती बायप्सीसाठी खाजगी प्रॅक्टीशनरांची मदत घेणार आहोत. त्यांच्या मदतीने बायप्सी घेवून त्याचे कन्फरमेशन करणार आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकारची मॅनेजमेंट एक सर्जीकल आणि एक मेडिकल मॅनेजमेंट असते. मेडिकल मॅनेजमेंटसाठी लागणारे इंजाक्नश ऍम्पुटर बी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे. त्याचा सप्लाय वेळोवेळी उपसंचालक कार्यालयाकडून होत असतो, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
तीनही म्युकरमायकोसिसचे मृत 40 ते 60 वयोगटातील
सातारा जिह्यात म्युकर मायकोसिसने बळी पडलेल्या तीनही रुग्ण हे रुग्ण पोस्ट कोव्हिड होते. त्यांच्यामध्ये म्युकर मायकेसिस ज्यांची डायबेटीस अनकंट्रोल आहे. ज्यांच्यामध्ये कोरोना होवून इम्युन्यु सक्रीय झाला आहे. त्यांच्यामध्ये त्याचा प्रार्दुभाव जास्त आढळून येतो. जे कोरोनाच्या ट्रीटमेंटमध्ये स्ट्रीरॉईडचा वापर केला जातो. ते स्ट्रीरॉईडमुळे सुद्धा प्रार्दुभाव वाढल्याचे दिसून येत आहे. ते तीन मृत हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत, असेही डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.