प्रतिनिधी/नागठाणे
नागठाणे (ता.सातारा) येथील अॅड. डी. एस. कुलकर्णी यांनी शिवारात सापडलेल्या दुर्मिळ घोरपडीस जीवदान दिले. ही घोरपड वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.
अॅड. कुलकर्णी यांच्या बामणकी नावाच्या शिवारातील पाण्याच्या हौदात ही घोरपड आढळली. पाण्यात असलेल्या या घोरपडीस बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयास करावे लागले. अक्षय साळुंखे व काही सहकाऱ्यांच्या मदतीने तिला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी श्री. शिरतोडे यांच्याकडे ही घोरपड सुपूर्द करण्यात आली. अॅड. कुलकर्णी यांच्या संवेदनशीलतेचे विशेष कौतुक होत आहे.