गोडोली / प्रतिनिधी
साताऱ्यात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याची माहिती असूनही कारवाई करण्याची जबाबदारी असणारे शासकीय अधिकारी, विभाग खुर्चीवर बसून काय करतात.२४ तासात शहरातील गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा. नाहीतर अधिकाऱ्यांच्या तोंडात गुटखा भरणार, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना हातात निवेदन देत मनसेचे शहर अध्यक्ष राहूल पवार आणि कार्यकर्त्यांनी जागतिक कँन्सर दिनाचे औचित्य साधून दिला.
राज्यभर नावाला गुटखा बंदी आणि प्रत्येक किराणा दुकान, टपरीवर सर्रास विक्री होताना दिसते. गुटखा बंदीची फुशारकी मारणारे प्रशासन विक्रेत्यांवर कारवाई करत नाहीत. कारवाई होत नसल्याने विक्री वाढली आहे.गुरुवारी दि.४ रोजी सातारा शहर मनसै ने अन्न व औषध कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना त्याबाबत जाब विचारला.शहरात गुटखा कुठे कुठे मिळतो, याचे शुटिंग करून पुरावे दाखवले.अन्न व औषध कार्यालयाच्या बाहेरच्या टपरीवर गुटखा विक्रीआणि कार्यालयाच्या भिंती गुटख्याच्या पिचकारींनी रंगल्याचे दाखवल्यावर अधिकाऱ्यांची चांगलीच तर्तररली.
यावेळी शहर अध्यक्ष राहुल पवार यांनी ,’ अन्न व औषध प्रशासनाला इशारा दिला की २४ तासांच्या आत जर शहरातील गुटखाबंदी झाली नाही तर कार्यालयातील उपस्थिती अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तोंडात गुटखा भरल्याशिवाय राहणार नाही.यावेळी कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होईल, त्याला जबाबदार प्रशासन असेल,’असा आक्रमक पवित्रा घेत सुनावले.
या वेळी अॅड. मुश्ताक बोहरी,शहर उपाध्यक्ष भरत रावळ,वैभव वेळापुरे, गणेश पवार, अविनाश भोसले, अझहर शेख, राज पुजारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.