मुख्याधिकारी म्हणून डॉ. विजय थोरात यांची रुजू होण्यापूर्वीच बदली
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची काही दिवसांपूर्वी पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहआयुक्त या पदावर नियुक्ती झाली होती तर भोरहुन साताऱयात डॉ. विजय थोरात आले होते. दोघांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला नव्हता. बुधवारी सायंकाळी राज्य शासनाकडून सातारा पालिकेचे हजर न झालेले मुख्याधिकारी डॉ. विजय थोरात यांची बदली पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे झाली आहे तर त्यामुळे सातारा पालिकेत पुन्हा बापट हे मुख्याधिकारी म्हणून येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातारा पालिकेत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी रुजू झाल्यापासून कामाचा आवाका मोठय़ा प्रमाणात वाढवला गेला आहे. मागच्या काळात आणि पिंपरी चिंचवड येथे बदली बदली होण्यापूर्वी त्यांनी अनेक कामे साताऱयात आणली. तसेच सातारा पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्या विचारांची सांगड घालून विकासकामे करत होती. त्यामुळे सगळ्यानाच अभिजित बापट यांच्या बदलीने नाराजी व्यक्त होत होती. सातारा पालिकेत मुख्याधिकारी म्हणून अभिजित बापट हेच हवेत अशी मागणी जोर धरत होती. दोघांनी ही आपल्या पदाचा पदभार स्वीकारला नव्हता. आज बुधवारी सायंकाळी थेट सातारा पालिकेत डॉ. विजय थोरात यांची पुणे येथे बदली झाल्याचा आदेश मेलवर पडला. दिवसभर डॉ. थोरात आणि बापट यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, सायंकाळी त्या चर्चेला पूर्णविराम मिळत आता रिक्त जागी मुख्याधिकारी म्हणून अभिजित बापट यांचीच पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे.