ऑनलाईन टीम / सातारा :
पुणे-बेंगळूर महामार्गावर तेलाचा टँकर उलटला आहे. साताऱयाजवळील शेंद्रे गावच्या हद्दीत बुधवारी पहाटे ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे पुणे-बेंगळूर महामार्गावर शेंदे गावाच्या हद्दीत कोल्हापूरकडे जाणारा तेलाचा टँकर विरुद्ध दिशेला जाऊन मोटारीवर आदळला. त्यानंतर तो टँकर पलटी झाला. दरम्यानच्या काळात रस्त्यावर तेल गळती झाली. अपघातामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करत त्यांनी वाहतूक सुरळीत केली. या अपघातात मोटारीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सातारा पोलीस याबाबतचा अधिक तापस करत आहेत.