औंध येथे क्रुतीशील शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न
वार्ताहर / औंध
पुरस्कारामागे कोणताही स्वार्थ नाही. नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या गुरुदेव कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. पुरस्कारामुळे काम करण्यासाठी बळ मिळेल असा विश्वास माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केला.
औंध ता. खटाव येथे क्रुतीशील शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, संजय यादव, प्रा. संजय निकम, सदाशिव घाडगे, हणमंत पवार, अशोक देशमुख, एस. एम देशमुख, पोपट मिंड, विजय येवले, विष्णू शिंदे, शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सावंत म्हणाले की, पुरस्कारामागे राजकीय स्वार्थ असल्याची शंका काही बांधवांच्या मनात आहे. मात्र अनेकदा सेवेतून निव्रुत्त झाले तरी त्यांचा सन्मान होत नाही. अशा होतकरू कर्तव्यदक्ष शिक्षकांचा सन्मान व्हावा याकरिता क्रुती समितीच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला आहे. यापुढेही तो कायम चालू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
संजय यादव, संजय निकम, पोपट मिंड, विजय येवले, फिरोज मुलाणी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील मुख्याध्यापक अशोक देशमुख, पोपट मिंड, दिलीप काळे, दत्तात्रय देशमुख, बापूराव गायकवाड, श्रीमंत कोकरे, यांचा क्रुतीशील शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सचिन सुकटे यांनी प्रास्ताविक केले. सी.आर जाधव यांनी आभार मानले.