वाई / प्रतिनिधी
वाई तालुक्यातील बोपर्डी येथे शेतात गुरे गेल्याच्या कारणावरून कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केल्याची घटना दि.1रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत जखमी झालेले खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोहन गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ते व त्यांची पत्नी रेखा या घोगटे नावाच्या शेतात जनावरे चारायला घेऊन गेले होते. परत सायंकाळी घरी गुरे नेताना शेजारील दिलीप किसन गाडवे यांचे शेतात गुरे गेली. त्यावरून दिलीप गाडवे व त्यांचा मुलगा अभिजीत गाडवे यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. मोहन गाढवे यांना कु-हाडीच्या तुंब्याने डोक्यात, कपाळावर, पाठीवर मारहाण केली. ही भांडणे गावापासुन शेत लांब असल्याने कोणीही सोडविली नाहीत भांडण झाल्यानंतर मोहन यांना मार लागल्यानंतर त्यांची पत्नी रेखा व त्यांच्या पत्नीच्या मामाचा मुलगा संतोष गाडवे व गणेश गाडवे यांनी त्यांच्या चारचाकी वाहनातून वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांवर गुन्हा दाखल असुन वाई पोलीस तपास करत आहेत.