सातारा / प्रतिनिधी :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेले नियम पायदळी तुडवत शहरात रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
याबाबत पालिकेकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी शहरात ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने सुरू असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश पथकास दिले आहेत.
त्यानुसार, रात्री उशिरा पोवई नाक्यावरील मरिआई कॉम्प्लेक्स येथील मॉझिनिअस बेकरीचे अमर जाधव, न्यू पूना बेकरीचे मिथून शिंदे, महेंद्र फैंजणी या तिघांच्यावर प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला.