प्रतिनिधी / सातारा
लाच देऊ नये आणि लाच घेऊ नये, लाच घेणे गुन्हा आहे.लाच मागणी केल्यास लाच लुचपथ प्रतिबंध विभागास कळवावे असे आवाहन विभागाच्यावतीने करण्यात येते. जनजागृती करण्यासाठी दि. 27 ते 2 नोव्हेंबर या दरम्यान दक्षता सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी केले आहे.
शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षता सप्ताहाची सुरुवात मंगळवार दि. 27 पासून सुरू होत आहे. दि.27रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय विभागाचे प्रमुख व त्यांच्या अधिपत्याखाली अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शपथ ग्रहण, दुपारी 4 वाजता पाचवड येथे पोस्टर लावणे, माहिती पत्रक वाटणे, दि.28 रोजी सकाळी 11 वाजता वाई शहरात पोस्टर लावणे माहिती पत्रक वाटणे, दुपारी 4 वाजता जावली तालुक्यातील कुडाळ येथे पोस्टर लावणे, पत्रक वाटणे, दि. 29रोजी सकाळी 11 वाजता कराडमध्ये मुख्य चौकात पोस्टर लावणे, पत्रक वाटणे, दुपारी चार वाजता रहिमतपूर येथे पोस्टर लावणे आणि पत्रके वाटणे, दि.30 रोजी सकाळी 11 वाजता कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे पोस्टर लावणे व पत्रके वाटणे, दि.31 रोजी सकाळी 11 वाजता भुईंज येथे तर दुपारी चार वाजता पाटण येथे तर दि.1 रोजी सकाळी 11 वाजता फलटण येथे तर दि.2रोजी सकाळी 11 वाजता मेढा येथे तर सायंकाळी 5 वाजता सातारा येथे पत्रक वाटप व पोस्टर लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.