सातारा / प्रतिनिधी :
वाई तालुक्यात जनतेच्या हाकेला धावून जाणारे जनायक आमदार मकरंद पाटील यांच्या कार्याचा दबदबा पाहून शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तुषार काळे यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना मकरंद पाटील म्हणाले, वाई तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम जनमाणसात रुजले आहे. शरद पवारांनी दिलेली विचारधारा कार्यकर्त्यांना समजली आहे. काळे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला बळ दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.