प्रतिनिधी / कुडाळ
जावळीत आज मुसळधार पाऊस पडला असून आखेगणी तालुका जावळी येथे एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम गावडे वय वर्ष 33 असे आहे. यासंदर्भात जावळी तहसील दार राजेंद्र पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर तुकाराम गावडे आखेगणी हे आपल्या शेतामध्ये काम करत असतानाच अचानकच पाचच्या सुमारास आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट सुरू झाला व अवकाळी पाऊस मुसळधार परत पडत होता. शेतात काम करत असणारे ज्ञानेश्वर तुकाराम गावडे यांच्या अंगावर थेट वीज पडली आणि जागेवरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गेल्या दोन दिवसांपासून जावळी तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी पाऊस पडत आहे. पाचगणी आखेगणी डोंगरी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात काल सायंकाळच्या सुमारास पाऊस झाला आज सलग दुसऱ्या दिवशीही आखेगणी पाचगणीच्या डोंगर पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस झाला यातच सदर शेतामध्ये सुगीचे दिवस सुरू आहेत शेतकरी वर्ग शेतामध्ये गहू ज्वारी यासह पिकांची काढणी भरणी आणि भरणी याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यातच अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे यातच आखेगणी येथे या शेतकऱ्यांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने आखेगणी गावावर शोककळा पसरली आहे मृत्यूची नोंद मेढा पोलीस मेळा पोलिसा मध्ये झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करत आहेत.