प्रतिनिधी/ सातारा
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू केलेले असताना देखील विनाकारण बाहेर फिरणाऱया तसेच दुकान सुरु ठेवण्यास परवानगी नसताना सुरु ठेवणाऱयांवर सातारा शहर पोलीस ठाणे तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी कारवाईचा बडगा उगारला.
कोरोना महामारीत विनाकारण फिरणाऱया 8 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजवाडा परिसरात काहीजण विनाकारण दुचाकीवरून फिरत होते. यावेळी शाहूपुरी पोलिस पेट्रोलिंग करताना त्यांना दुचाकीवरून विनाकारण फिरताना आढळलेल्या रवी दीपक देशपांडे, स्वाती संतोष भोसले, स्नेहा भोसले (सर्व. रा. चिमणपुरा पेठ) व अक्षय प्रकाश भोसले (रा. सैदापूर), रफीक कादर शेख (वय 35, रा. शनिवार पेठ, सातारा), स्वप्नील शिवाजी आवारे (वय 35, रा. सातारा), दुकान उघडे ठेवल्याने राम जनार्दन साळुंखे वय 48, रा. प्रतापगंज पेठ, सातारा यांच्यावर कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी या सहाजणांवर विनाकारण फिरुन जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी पोवईनाका परिसरात दीपक चहा शॉप सुरु ठेवल्याप्रकरणी दीपक विठ्ठल दळवी (वय 29 रा. कामाठीपुरा, सातारा), तसेच फास्ट फूडचे दुकान सुरु ठेवल्याप्रकरणी गणेश शंकरराव तोरस्कर (वय 39, रा. करंजे, महानुभव मठाशेजारी, सातारा) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कारवाई सुरु केल्याने विनाकारण फिरणाऱया तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर रविवारी चांगलाच चाप बसल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील वर्दळ खूपच कमी झाली होती.