प्रतिनिधी / सातारा :
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहर परिसरातील बॉम्बे रेस्टॉरंट ते अजंठा चौक येथे आयशर व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात डांगेघर, ता. जावली येथील एकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.
मंगळवार दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सातारा हद्दीत असणाऱ्या पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट ते अजंठा चौक परिसरात आयशर व ट्रक यांच्यात अपघात झाला. यामध्ये अमित तानाजी सुर्वे, (वय 39, रा. डांगेघर, ता. जावली) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.