वृत्तसंस्था/ क्लेव्हलँड
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या क्लेव्हलँड महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकन साथीदार ख्रिस्टीना मॅकहेल यांनी महिला दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
रविवारी झालेल्या महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सानिया आणि मॅकहेल यांनी जार्जियाची कॅलेसहॅनीकोव्हा आणि रूमानियाची मिटु यांचा 6-3, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.