टिळकवाडी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी \ बेळगाव
सायकल चोरी प्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी गुरुवारी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्या जवळून चोरीची सायकल जप्त करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी भाग्यनगर पहिला क्रॉस परिसरात ही घटना घडली होती.
श्रीवत्स कांतण्णावर (वय 19, मुळचा रा. बेंगळूर, सध्या रा. भाग्यनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव असून पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. श्रीवत्स हा डिप्लोमाचा विद्यार्थी असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
गणेशबाग, जक्कीनहोंडा परिसरातील सुनील दत्तात्रय पाटील यांची 6 जानेवारी रोजी सायकल चोरण्यात आली होती. भाग्यनगर पहिला क्रॉस परिसरात ही घटना घडली असून बुधवारी या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आला होता. शिकवणीसाठी गेले असता ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.