ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यातच आता अभिनेत्री सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोनाची बाधा झाली आहे. याबत स्वतः सारा ने सोशल मीडियावर माहिती दिली.
सारा ने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली यामध्ये ती म्हणते, माझ्या ड्रायवरला कोरोनाची लागण झाली आहे. तात्काळ आम्ही ही माहिती बीएमसीला दिली आहे. त्याला आता क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. माझी मदत केल्याबद्दल पालिकेचे आभारही तिने यावेळी मानले आहेत.
ड्रायव्हरला कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संपर्ण कुटुंबाची आणि इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, सारा आपली आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिम यांच्या सोबत राहते.