वाठार स्टेशन- पिंपोडे बुद्रुक रस्त्यावरील वाकडा पुलाला संरक्षण कठाडे नसल्याने क्षेत्रमाहुली येथील लखन राजगे घटनास्थळी ठार
प्रतिनिधी /सातारा
वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्रुक येथे वाकडय़ा पुलावर संरक्षण कठाडे नसल्याने आज दुपारी 12 च्या सुमारास क्षेत्रमाहुली जि सातारा येथील युवक लखन राजगे वय 27 याचा हिरोहोंडा स्प्लेनडर (श्प्11ँळ1815) गाडी वाकडय़ा पुलावरून खाली गेल्याने जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लखन राजगे हा वाठार स्टेशनवरून पिंपोडे बुद्रुकच्या दिशेने चालला होता यावेळी या रस्त्यावरील वाकडय़ा पुलावर गेल्यावर गाडीवरील ताबा सुटल्याने तो थेट पुलाला संरक्षण कठाडा नसल्याने खोल पुलावरून खाली कोसळला व यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना कळताच वाठार पोलीस ठाण्याचे स.पो.नि स्वप्नील घोंगडे, पोलीस कर्मचारी तुषार आडके, अतुल कुंभार, धुमाळ, चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्यावर संताप व्यक्त केला वेळोवेळी मागणी करूनही व याबाबतच्या बातम्या प्रकाशित होवूनही या निगरगट्ट अधिकायांना कोणताही फरक पडत नसल्याने या जीवाशी खेळणाया अधिकायावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.