प्रतिनिधी/ बेळगाव
येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने प्रख्यात साहित्यिक आचार्य अत्रे यांची 123 वी जयंती साध्या पद्धतीने नुकतीच साजरी करण्यात आली. वाचनालयाच्या अध्यक्षा सुनीता मोहिते यांच्या हस्ते आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरवर्षी या जयंतीनिमित्त वाचनालयाच्यावतीने प्रथितयश लेखकास पंचवीस हजार रुपयांचा रोख आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार देऊन आचार्य अत्रे जयंती मोठय़ा प्रमाणात साजरी करण्यात येते. मात्र, यंदाही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ती साधेपणाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सदस्य अनंत लाड यांनी आचार्य अत्रे यांची थोडक्यात माहिती विशद केली.
यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष नेताजी जाधव, कार्यवाह रघुनाथ बांडगी, सहकार्यवाह ऍड. आय. जी. मुचंडी, कार्यकारी सदस्य अभय याळगी, लता पाटील, प्रसन्न हेरेकर व व्यवस्थापक व्ही. एल. कडगावकर उपस्थित होते.