सावंतवाडी / प्रतिनिधी-
सावंतवाडी शहरात प्रत्येक प्रभाग निहाय गेल्या आठवड्याभरात रॅपिड टेस्ट मोहीम राबवण्यात आली तर शहरात बाजारपेठेत इंदिरा गांधी व्यापारी संकुलात तब्बल महिनाभर त 27 मे ते 21 जून या कालावधीत रॅपिड टेस्ट केंद्र सुरू करण्यात आले होते. या महिन्यभराच्या कालावधीत जवळपास 11 77 सणांची टेस्ट करण्यात आली. त्यात एकूण 69 जन पॉझिटिव्ह आढळले. आता बाजारपेठ खुली करण्यात आल्याने सावंतवाडी शहरातील रॅपिड टेस्ट केंद्र स्थलांतरित करण्यात आली असून उद्या 22 जून पासून हे टेस्ट केंद्र काझी शहाबुद्दीन हॉल येथे सकाळी 10 ते 1या वेळेत चालू ठेवण्यात येणार आहे. तरी सावंतवाडी शहरातील नागरिकांनी जर कुणाला लक्षणे आढळल्यास त्यांनी काझी शहाबुद्दिन हॉलमध्ये जाऊन टेस्ट करून घ्यावी असे मनपाचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी स्पष्ट केले.